राळेगाव येथे महाविकास आघाडीचे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे येत्या 24/9/2024 रोज मंगळवारला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सह महाविकास आघाडीने खालील मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.(१) राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा.(२) शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.(३) अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५०००० रूपये मदत देण्यात यावी.(४) राळेगाव तालुक्यातील मजूर वर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.(५)) शेतकरी बांधवांना सरसकट पिक विमा ताबडतोब देण्यात यावा.(६)) सोयाबीनला ७००० रूपये भाव तर कापसाला १०००० रूपये भाव देण्यात यावा.(७) पी.एम. किसान योजनाचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे.(८) ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना २,५०,००० रूपये प्रति घरकुल अनुदान देण्यात यावे सोबतच गाव आणि शहर असा भेदभाव काढून टाकण्यात यावा.(९) घरकुल लाभार्थ्यांना ताबडतोब अनुदान देण्यात यावे.(१०) अतिक्रमित घरकुल लाभार्थ्यांना राहत्या घराचे ताबडतोब पट्टे देण्यात यावे.(११) ज्या घरकुल लाभार्थ्यांना स्वताच्या मालकीची जागा नाही त्यांना शासनाने जागा उपलब्ध करून देण्यात यावी.(१२) अल्पसंख्याक घरकुल योजनेअंतर्गत अल्पसंख्याक समाजाला घरकुल योजना त्वरित मंजूर करण्यात यावी.(१३) राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून त्रास होतो सोबतच जंगली जनावरे पिकाची नासाडी करण्यात येऊन पाळीव जनावरांना ठार मारणे,जखमी करणे, शेतकरी शेतमजूर यांच्यावर जंगली जनावरांपासून होणारे हल्ले होत असल्याने कायमस्वरूपी बंदोबस्त करणे,(१४) शेत पांदन रस्ते ताबडतोब सुरू करण्यात यावे.(१५) घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी.(१६) तालुक्यात शहरासह धडक सिंचन विहीर योजना त्वरित सुरू करण्यात यावी.(१७) प्रलंबित कृषी पंपाची विज जोडणी ताबडतोब करण्यात यावी.(१८) शेतकऱ्यांना २४ तास पंपाचा विज पुरवठा करण्यात यावा.अशा एक ना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून या मोर्चाचे नेतृत्व यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख, माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर, महिला प्रदेशाध्यक्ष मा.सौ.संध्याताई सव्वालाखे, कांग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँडव्होकेट प्रफुल्ल मानकर , कळंब बाजार समितीचे सभापती मा.प्रविण देशमुख, शिवसेना यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम, यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, कांग्रेस ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इंजिनीअर अरविंद वाढोणकर हे करणार असून प्रमुख उपस्थिती मिलिंद इंगोले अध्यक्ष खरेदी विक्री संघ राळेगाव, नंदकुमार गांधी अध्यक्ष वसंत जिनिंग राळेगाव, रविंद्र शेराम अध्यक्ष नगरपंचायत राळेगाव, जानराव गिरी उपाध्यक्ष नगरपंचायत राळेगाव यांची राहणार असून शेतकरी शेतमजूर व व्यापारी या सर्व घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, राष्ट्रवादी काँग्रेस राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे, कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, शिवसेना शहरप्रमुख इम्रान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.