येवती शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना टिफीन बाॅक्सचे वाटप

जि.प.उच्च प्राथमिक शाळा,येवती येथे आज सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या शुभहस्ते टिफीन बाॅक्सचे वाटप करण्यात आले.यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते,तेव्हा विद्यार्थ्यांना जे बक्षिस म्हणून पैसे मिळाले होते त्यातून सर्वच विद्यार्थ्यांना टिफीन वाटप करण्यात आले.मागील वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने पाणी बाॅटल,एक नॅपकिनसारखा हातरुमाल आणि अंकलिपीचे वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.साईनाथ भोयर,उपाध्यक्ष श्री.किसन कोल्हे,सदस्य श्री.प्रमोद कोल्हे आणि सदस्या श्रीमती सविता अशोक धोटे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला सर्व शिक्षक हजर होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन माकोडे मॅडम यांनी केले तर आभार सरोदे सर यांनी मानले.विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता