अजब तुझे सरकार एकनाथ,देवेंद्रनाथ,अजितदादा, नाफेडच्या अटी शर्तीत सोयाबीनची खरेदी अडकली

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मोठा गाजावाजा करत नाफेडणे शेतकऱ्यांकडून सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करून घेतली पण खरेदी मात्र सुरूच केली नाही खरेदीसाठी नाफेड ने बऱ्याच अटी शर्ती घातल्या त्या अटी शर्ती शेतकऱ्यांचे सोयाबीन पूर्ण करू न शकल्याने राळेगाव येथे नाफेडणे एकही क्विंटल सोयाबीनचा म** खरेदी केला नाही नाफेड मार्फत हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी केली जाणार असे सांगत नाफेडणे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी करून घेतली राळेगाव येथे 530 शेतकऱ्यांनी नाफेड कडे सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली सोयाबीनचा हमीभाव 4892 आहे व त्यामुळे शेतकरी आतुरतेने नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीची वाट पाहत होते प्रत्यक्षात सोयाबीनचे दर हे 3000 रुपयापासून आहेत किंवा त्यापेक्षाही खाली होते पण दिवाळी तोंडावर असताना सुद्धा नाफेडने सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू केली नाही त्यामुळे शेतकऱ्याला मातीमोल भावात आपले सोयाबीन विकावे लागले सोयाबीन खरेदीसाठी नाफेडणे बऱ्याच अटी शर्ती घातल्या आहेत त्यामध्ये सोयाबीनमध्ये ओलावा आद्रता 12% ,माती काडी कचरा बाह्यपदार्थ डागे 2 टक्के, चिमलेले अपरिपक्व व रंगहीन 5टक्के, क्षतीग्रस्त व कीड किंवा भुंगा लागलेले दाणे 3टक्के ,मशिनने तुटलेले किंवा भेगा पडलेले दाणे 15 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडणे शेतकऱ्यांसमोर ह्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत एवढ्या अटी शर्ती पूर्ण करून किती शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतले जाणार हे नाफेडलाच ठाऊक सोयाबीन काढतेवेळी त्यामध्ये काही प्रमाणात ओलावा असणारच आहे काही प्रमाणात काडीकचरा हा असणारच आहेत नाफेडणे घालून दिलेल्या अटी शर्ती ह्या केवळ प्लांट वरील सोयाबीन पूर्ण करू शकतात शेतकऱ्यांच्या शेतातील नाही ह्या अटी शर्ती खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला लावायच्या जेणेकरून आपल्याला खरेदी करायची वेळच येणार नाही असे तर नाफेडला करायचं नव्हतं ना अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येत आहे म्हणजेच नाफेडला सोयाबीन खरेदी करायचीच नव्हती हे स्पष्ट होते एकीकडे दाखवायचे की आम्ही सोयाबीन खरेदी सुरू केली आहेत व दुसरीकडे मालच घ्यायचा नाही असे दुटप्पी धोरण नाफेडणे अवलंबलेल्याचे दिसते सध्या शेतकरी जे सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत त्या सोयाबीनमध्ये 15 टक्के आद्रता आहे कारण नुकताच पाऊस येऊन गेला होता तसेच वातावरणात सुद्धा थंडावा होता त्यामुळे तो सोयाबीनमध्ये येणे स्वाभाविक होते पण नाफेडचे आद्रतेची अट ही 12% आहेत नाफेडणी ही अट काढून 15% करावयास हवी होती जेणेकरून काही शेतकऱ्यांचे सोयाबीन हे घेतले गेले असते ज्यामुळे शेतकऱ्याला हमीभाव ४८९२ रुपये मिळाला असता पण 12% आद्रतेची अट घातल्यामुळे कुठल्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन ही 12 टक्के आद्रतेची अट पूर्ण करू शकत नाही तसेच इतरही अनेक अटी शर्ती खरेदीसाठी असल्याने शेतकरी ह्या अटी शर्ती पूर्ण करू शकले नाहीत परिणामी नाफेडणे राळेगाव येथे एकही क्विंटल म** घेतला नाही नाफेड ने राळेगाव येथे काटा पूजन केवळ केले काही शेतकऱ्यांना खरेदीसाठी मेसेजही पाठवले पण त्या शेतकऱ्यांच्या सॅम्पल मध्ये जास्त ओलावा असल्याने त्या शेतकऱ्यांचा हि माल नाफेडणी खरेदी केला नाही दिवाळीच्या तोंडावर नाफेडणे सोयाबीनचे खरेदी न केल्याने शेतकऱ्याला मातीमोल भावात आपले सोयाबीन विकावे लागले काही दिवसांनी नाफेड सोयाबीनची खरेदी सुरूही करेल पण ज्या शेतकऱ्याला गरजे पोटी दिवाळीच्या तोंडावर आपले सोयाबीन विकावे लागले आहेत त्या शेतकऱ्यांचे काय त्याला तर क्विंटल मागे दोन हजार रुपयाचे नुकसान सहन करावे लागले व आपली गरज व दिवाळी साजरी करावी लागली