

हिंगणघाट:- १७ नोव्हेंबर २०२२
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी पासून कश्मीर पर्यंत निघालेली भारत जोडो यात्रा निघाली असून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. गुरुवारी दिनांक १७ नोव्हेंबरला सकाळी पदयात्रेला प्रारंभ झाल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगणघाट मतदार संघाचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे सह नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी पदयात्रेत सहभाग घेत त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती.
पदयात्रे दरम्यान राहुल गांधी यांच्या गळ्यामध्ये सुतीहार टाकून त्यांचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी स्वागत केले व पदयात्रेमध्ये सहभागी होऊन पायी चालता चालता त्यांच्याशी संवाद केला तसेच नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याने आभार मानले .याबाबत सविस्तर वर असे की भारतात ०७ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या भारत जोडो पदयात्रा केरळ,तामिळनाडू,कर्नाटका, तेलंगणा आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून असा प्रवास करत महाराष्ट्रात दाखल झाली आहे. एकजुटीने भारत जोडो यात्रेमध्ये देशातील द्वेष आणि क्रोध संपण्यासाठी देशातील पुरोगामी विचारांच्या संघटना व मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे तसेच निघालेला पदयात्रेत विद्यार्थी,युवक,तरुण पिढ, मुली,महिला व नागरिक मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी होत आहे. या यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या पन्नास हजारा पासून दीड ते दोन लाखापर्यंत आहे.देशात चैतन्यमय वातावरण निर्माण होत आहे. आजपर्यंत तीन हजारच्या किलोमीटरच्या वर पायी प्रवास झाला आहे ही पदयात्रा जगाच्या पाठीवर आतापर्यंत काढलेली नाही ही पदयात्रा आता महाराष्ट्रातील ३८१ किलोमीटरचा प्रवास करत मध्यप्रदेशच्या दिशेने जात आहे.
या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा सहभागी होणार होते परंतु त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे त्या जागी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सामील झाले आहे.
जाती धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई,बेरोजगारी या विरुद्ध आवाज उठवून प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देणारे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली दांडी यात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार आहे. दांडी यात्रेने देशात क्रांती केली.देश एक केला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्रेतून सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, देश हिताची व प्रेमाची ही ऊर्जा एक ऐतिहासिक चळवळ ठरणार आहे. असे मत माजी आमदार राजु तिमांडे यांनी व्यक्त केले आहे.
