राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत बेवारस वाहनांच्या लिलाव प्रक्रियेला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाईत तर काही बेवारस आढळलेल्या दुचाकी अनेक वर्षापासून धूळ खात पडलेल्या होत्या, या दुचाकी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात सडून त्यामुळे प्रांगणाची जागा कमी पडत होती. याच 57 दुचाकींची आज दिनांक 13/07/2023 रोजी सकाळी 12/00 वा पोलिस स्टेशन राळेगाव येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. सदर लिलाव प्रक्रियेत यवतमाळ,चंद्रपूर, वणी,नांदुरा,पांढरकवडा, राळेगाव, नेर, कळंब, उमरखेड,येथून आलेल्या 93 व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. सदर 57 वाहनांची सरकारी किंमत 1,02,000/- रुपये होती.लिलाव मध्ये वणी येथील शेख फारुक शेख पीरसाहब यांनी सर्वाधिक 4 लाख 6 हजार रुपयांची बोली लावून लिलाव प्रक्रियेत बोली आपल्या नावे केली. सदर लिलाव प्रक्रियेत ठाणेदार श्री रामकृष्ण जाधव साहेब, तहसीलदार राळेगाव यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी श्री अनिल कणसे साहेब, पो उप नी श्री मोहन पाटील, पो उप श्री गायकवाड साहेब हजर होते, लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक श्री.मधुकर राजूरकर, पंच म्हणून श्री उमेश बोरा,श्री.योगेश मेहता हे उपस्थित होते.
सदर लिलाव प्रक्रियेतून मिळालेली एकूण 4,06,000/- रुपये रक्कम ही सरकारजमा करण्यात येणार आहे.