
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दिनांक 23 जानेवारी 2026 रोज आत्मानुसंधान भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे सुभाष चंद्र बोस जयंती व ग्रामसभा प्रशिक्षण शिबिर चे उद्घाटन श्री सुबोधदादा संचालक भू वैकुंठ अड्याळ टेकडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री अविनाश भाऊ आंबेकर चंद्रपूर, श्री प्रवीण जी राऊत, पोलिस समन्वयक समिती अध्यक्ष भारत, श्री रुपचंद भाऊ दखणे घाटी, श्री दुष्यंत गाडकीने नागपूर, यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे श्री या कार्यक्रमाचे सदर शिबिरात ग्रामसभा, भारतीय संविधान, ग्राम विकास व लोक सहभाग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिरात अड्याळ, ऊश्राळ मेंढा, खडकी, भिवंडी(ठाणे), ब्रम्हपुरी, सारंगढ, कोजबी चक, जवरा बोडी, ढोलसर, पुयार दंड, वाकरला, कोकडी, नागपूर, उमरी, अर्जुनी, चंद्रपूर इत्यादी भागातून लोकांनी सहभाग घेतला. शेवटी शांती पाठ, जयघोष व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
