
प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ
:गेल्या दोन दिवसांपूर्वी निसर्ग राजाच्या अवकृपेने पाऊसाने थैमान घालून अवध्या एक ते दोन दिवसात हळद,सोयाबीन,कापूस ,तुर, ऊस,भाजीपाला, केळी, अन्य पीकासह बळीराजाला झोडपुन टाकुन अर्थीक संकटाच्या कैचीत अडकवील्या गेल्या अनेक दिवसा पासुन आपल्या शेतात हाडाचे काड करून, रक्त आटवुन काबाड कष्टकरुण पेरणी पासुन ते घरी येई पर्यंत शेतकरी पीकांची जोपासना करत होता.त्यातच त्याने विविध स्वप्ने रंगवलेली होती.परंतु क्षणात त्याची स्वप्न नष्ट झाली.होत्याच नव्हत झाल ,व जे उगवलं लहानाच मोठे केलेले पीक डोलत असताना निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पडली ते निराशा. निसर्ग राज्याच्या अवकृपेने झालेल्या पाऊस, वारा अन् थारा न लागल्यामुळे तोंडातील घास हिरावुन घेतल्या गेला त्यामुळे शेतकरीअर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला असुन खंगावलेल्या नागवलेल्या अखेर शेतकऱ्याचा वाली कोण ? प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी विविध प्रकारच्या कायालयाचे कर्मचारी आपल्या हक्काच्या मागणी साठी रस्त्यावर उतरले. तर जुन्या पेन्शन साठी काही वेग वेगळ्या मुद्यावर संपावर धरणे आंदोलन ,काम बंद अशी अवस्था काही दिवसापूर्वी दिसून आली .परंतु शेतकरी अद्याप जागरूक झालेला दिसून आलेला नाही.अनेक वेळी अवकाळीचा फटका शेतकऱ्याला बसला त्यातच पिकांचे पंचनामे अन् कधी मिळेल प्रशासनाची मदत अश्यातच निसर्ग राज्याचा घाला येऊन बळी राज्याच्या संसाराची राखरांगोळी निसर्ग राज्याने केली अन जगाचा पोशिंदा नागवा झाला असुन थकत चालला आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही जिल्हाला लाभलेल पालक मंत्री झालेल्या पिकाच्या नुकसानीचे बळी राज्याच्या बांधावर जाऊन सांत्वन करण्यास वेळ मीळत नसेल का? मंत्री महोदयानी वेळ मीळाल्यास झालेल्या शेतकऱ्या च्या घरी जाऊन विचार पुस करुण सात्वंण करणे अत्यंत गरजेचे असुन नेमीची येतो उन्हाळा असे होऊ नये अशी आस जगाच्या पोशिंदयाची.
