वरूड जहांगीर तांडयातील ट्रान्सफॉर्मर दुरूस्त होता होईना, शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे उत्पादन धोक्यात

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव विद्युत वितरण कंपनी झाडगावच्या अधिपत्याखाली येत असून या गावात पंपाचे कनेक्शन भरपूर प्रमाणात असल्याने एक आत्राम डीपी दुसरी चिव्हाणे डीपी तर तिसरी तांडा डीपी अशाप्रकारे तीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून त्यांच्या कॅपिसिटीप्रमाणे पंपाचे कनेक्शन जोडल्या गेले आहे.अशातच दिवसेंदिवस या ट्रान्सफॉर्मरवर पंपाचा भार वाढत चालला असून प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर अधिकचा भार वाढत चालला असल्याने नियमित ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून याचे एकमेव कारण म्हणजे अवैध विद्युत पुरवठा हा मोठ्या प्रमाणात वाढला असून तांड्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरची पंपाची कपॅसिटी आठ ते दहा पंपाची असल्याचे सांगितले जात असून या ट्रान्सफॉर्मरवर वैध आणि अवैध असे विस ते बाविस पंपाचे कनेक्शन असल्याने हे तांडयातील ट्रान्सफॉर्मर आता काही दोन तीन महिन्यांत दोन तीन वेळा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले असून ते परत परत जळून जात असून याला कारण हेच की कपॅसिटी पेक्षा जास्त भार ह्या ट्रान्सफॉर्मरवर असल्याने असा प्रकार घडत असून या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असून एक तर जास्त पावरचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे नाही तर अवैध विद्युत पुरवठा धारकावर आळा घालण्यात यावा .या सर्व गोष्टी विद्युत वितरण कंपनीत असलेल्या वरीष्ठापासून तर कनिष्ठ कर्मचारी बंधूना माहीत असून यावर उपाययोजना करण्यात यावी व नियमित ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करून नियमित विज पुरवठा मिळेल अशी व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून तोंडांत आलेल्या घासापासून शेतकरी वंचित होणार नाही अशी कळकळीची विनंती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे वरूड जहांगीर येथील शेतकरी श्रावनसिंग वडते यांनी केली आहे .