राळेगाव मतदारसंघात प्राध्यापक अशोक उईके यांचा 2812 मतांनी विजय

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव मतदारसंघात प्राध्यापक अशोक उईके यांनी विजय संपादन केला आहे. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली असून त्यांनी 2753 मतांनी आपला प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. मतदारसंघातील राळेगाव, कळंब, आणि बाभुळगाव या प्रमुख शहरांनी प्राध्यापक उईके यांना निर्णायक पाठिंबा देत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

प्राध्यापक अशोक उईके यांचा विजय स्थानिक पातळीवर मोठा जल्लोष साजरा करत स्वागत करण्यात आला. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात देखील लढत अतिशय चुरशीची राहिली, मात्र उईके यांनी आपली आघाडी कायम राखत मतदारांचा विश्वास संपादन केला.

या विजयामुळे राळेगाव मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्राध्यापक उईके यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे वचन देत, आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.