पिसाळलेल्या श्वानांचा फुलसावंगीत धुमाकुळ,चिमुकल्यांचा घेतला चावा

फुलसावंगी/प्रतिनिधीःसंजय जाधव


येथील अमोल गुद्दाल यांचा चिमुकला आयुष यांच्या गालाचा लचका या पिसळेलेल्या श्वानाने घेतला.तसेच विलास मोटे यांचा मुलगा विनोद यांच्या मुलाच्या डोक्याला चावा घेत गंभीर जख्मी केले.तसेच कन्हया वायकूळे या बालकाचा चावा या पिसाळलेल्या श्वानांने घेत फुलसावंगीत अक्षरशः धुडगुस घातला आहे.
फुलसावंगीत सदरील प्रकार हा काय नविन राहिला नाही येथे काही दिवसापुर्वी माकडांनी अनेकाचा चावा घेत गंभीर जखमी केले होते.तेच आता गावातील पिसाळलेल्या श्वानांनी अक्षरशः धुडगुस घालत दि.१९ मे रोजी गावातील तीन ते चार चिमुकल्यांचा चावा घेत गंभीर जखमी केले आहे.त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारा करिता पाठविण्यात आले आहे.
या पिसाळलेल्या श्वानांमुळे सध्या ग्रामस्थात भितीचे वातावरण निर्माण झाले ! आहे.त्या श्वानांचा बंदोबस्त करून फुलसावंगी वासीयांना भयमुक्त करावे अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.

या प्रकारास गावातील दुर्गंधीच कारणीभूत

ग्रामपंचायतच्या उपाययोजना शुन्य

किनवट रस्त्यावर व राहूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गावातील घाण कचरा तसेच चिकन व्यवसाय करणाऱ्या कडून उरलेले मास पिसे या रस्त्याच्या कडेला टाकले जाते.त्यामुळे हे कच्चे मास खाल्ल्यामुळे हे श्वान हिंस्र होऊन बालकांना आपले लक्ष बनवत असल्याचे मत नागरिकातुन व्यक्त होत आहे. रस्त्यावर जवळपास २० ते २५ श्वानांचे टोळकेच ठिय्या मांडून बसलेले असतात.त्यामुळे येथून ये-जा करणे देखील कठीण होवून बसली आहे.चिकण व्यवसायकांसाठी व गावातील घाण कचरा यांचे व्यवस्थापन करण्यात ग्रामपंचायत कमी पडत आहे.त्यांचे या बाबतीत कुठलेही नियोजन नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर दुर्गंधी सुटत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने या सर्वप्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थात नाराजी दिसून येत आहे.