
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव विदयूत महावितरण कंपनीच्या झाडगाव कार्यालयाच्या अखत्यारीत येत असून या गावात भरपूर सिंचन करणारे शेतकरी असल्याने तीन ट्रान्सफॉर्मर असून त्यापैकी एका ट्रान्सफॉर्मरवर तांड्यातील पीठगिरणी, घरगुती लाईट आणि त्या मार्गावरून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांचे पंपाचे कनेक्शन आहे.या ट्रान्सफॉर्मरवर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने ते ट्रान्सफॉर्मर कसे तरी चालत होते.अशातच दोन दिवसांपासून ही डी.पी. बंद पडली असून याबाबत चौकशी केली असता ते ट्रान्सफॉर्मर गेले असल्याचे दिसून आले.आता शेतकऱ्यांना शेतीसाठी ओलित करायची वेळ आली असता अशाप्रकारे संकट ओढवल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले असून सध्याचे राजकारण पाहता राज्यकर्त्यांना या समस्यांशी काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे या लोकप्रतिनिधींना सुद्धा या शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही .अशातच या विभागातील झाडगाव कार्यालयातील वरूडला कार्यरत लाईनमन यांना फोनवर संपर्क केला असता वरिष्ठ अधिकारी महावितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी माहिती दिली असल्याचे कपिल नहाते या लाईनमनने सांगितले. तर कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नसून प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी कळविल्याशिवाय कामं केली जात नाही.अशातच शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून ताबडतोब ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याची मागणी वरूड जहांगीर येथील शेतकरी तथा खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्धारे केली आहे.
