सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव मतदार संघात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील किन्ही जवादे फाट्यावर कटपॉईट नसल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जिव गमवावा लागला तर काहीना कायम स्वरूपी अपंगत्व आले आहेत मात्र कटपॉईटची समस्या आतापर्यंत कोणत्याच नेत्यांनी मार्गी लावली नाही.
दहा वर्षापूर्वी काँग्रेसचे प्रा वसंत पुरके हे सत्तेत होते तर २०१४ पासुन भाजपचे प्रा डॉ अशोक उईके हे सतेत्त आहे तसे या दोन्ही राजकीय पक्षाचे वजनदार नेते हे स्थानिक किन्ही जवादे गावात असतात तरी सुद्धा आजपर्यंत किन्ही फाट्यावर कटपॉईट नसल्यामुळे शेकडो अपघात होऊन सुद्धा २५ हजार नागरिकांना मुठीत जिव घेऊन विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो हा मुद्दा स्थानिक नेत्यांनसह दोन्ही पक्षाच्या आजी माजी आमदारांना महत्वाचा नव्हता का असा प्रश्न ग्रामस्थ निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित करीत आहेत
किन्ही फाट्यावरून किन्ही जवादे चाचोरा एकुर्ली विहिरगाव खैरगाव वेडशी रिधोरा डिगडोह या गावातील नागरिकांना प्रवास करावा लागतो त्यामुळे या गावातील शेतकरी वाहन चालक व दुचाकी चालक ॲटो चालक स्कुल बस सह अन्य नागरिक वर्षानोवर्ष स्वतःचा जिव मुठ्ठीत घेऊन विरुद्ध दिशेने प्रवास करित आहेत अनेकदा कटपॉईटची समस्या नागरिकांनी लोकप्रतिनीधीकडे मांडली परंतु दखल झाली नाहीत
परिणामी या फाट्यावरुन जाणाऱ्या गावातील ज्या ज्या व्यक्तीचे अपघात झाले ते कुंटुब आजही आपल्या दुखाःत असुन दुखातुन सावरले नाहीत खरच त्याच्या कुंटुबातील नागरीक आता मतदान करतांना विचार करणार तसेच गावातील नागरिक सुद्धा आतातरी आपली समस्या मतदान मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराला मांडणार का ?
किन्ही जवादे सह फाट्यावरून जोडलेल्या गावातील नागरिकांना आयुष्य भऱ्यासाठी असलेली कटपॉईटची समस्या गंभीर असुन या समस्येसाठी लोकप्रतीनीधीसह प्रशासन सुद्धा जबाबदार असल्याचे नागरीकांकडून बोलत्या जात आहेत त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत समस्येने त्रस्त असलेले लोक मतदानाच्या माध्यमातून तर आपला रोष व्यक्त करणार असी समस्याग्रस्त गावागावात चर्चा सुरु आहेत
किन्ही जवादे फाट्यावरुन नऊ गाव जोडलेले आहेत मात्र फाट्यावर कटपॉईट नसल्यामुळे मागील दोन वर्षात अपघातामुळे स्थानिक ६ नागरिकांना जिव गमवावा लागला तसेच ५० च्यावर नागरिकांना अपंगत्व आले कटपॉईटची मागणी करून कटपॉईट न देणे हे प्रशासनाची चुक असुन त्याची किंमत नागरीकांना अपघातात जिव गमावून मोजावी लागत आहेत
लोकप्रतीनीधीच्या पाठपुराव्या अभावी समस्या कायम
फाट्यावरून जोडलेल्या गावातील प्रत्येक ग्रामपंचायतने ठराव दिले तसेच जिल्हाधिकारी पोलीस एनएचआयला ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदनाद्वारे मांगणी केली मात्र स्थानिक लोकप्रतीनीधीचा पुढाकार व पाठपुरावा नसल्यामुळे आजही ती समस्या निकाली लागली नाहीत
**प्रतिक्रिया**
कटपॉईटसाठी आम्ही सर्वाना निवेंदन दिले आहेत आमच्या गावात लोकप्रतिनीधीने एक विकास काम कमी केले असते तर चालले असते परंतु आमची मुळ समस्या कटपॉईट आहे ती निकाली लावणे अत्यंत गरजेचे आहेत आम्ही दररोज दहशतीत प्रवास करतो प्रशासनाने सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहेत
प्रसाद निकुरे
ग्रामस्थ किन्ही जवादे