
सहसंपादक -रामभाऊ भोयर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चला जाणूया नदीला संवाद यात्रा वैनगंगा नदी उपक्रम अंतर्गत भंडारा येथील तहसीलदार अरविंद हिंगे त्यांच्या नेतृत्वात मौदी पुनर्वसन जुनी मौदी आंभोरा नवीन पुलाजवळ रॅलीचे आगमन झाले. यावेळी विवेक राजूरकर वन विभाग भंडारा, शाहिद खान नदी समन्वयक मानद वन्यजीव रक्षक, अनिल बोरकर नदी समन्वयक सचिव ग्रामीण युवा प्रायोगिक मंडळ भंडारा, सरपंच जयश्री वंजारी ,ज्ञानेश्वर चांदेकर ग्रामपंचायत सदस्य ,सरस्वता देवगडे,वर्षा वंजारी बँक सखी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनोद वंजारी म्हणाले की ज्या लोकांचे पुनर्वसन झाले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुनर्वसन क्षेत्रात गेल्या. जे लोक भूमीन झाले. त्याकरता सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आज त्यांना रोजगार देण्याची गरज आहे परंतु गोसेखुर्द प्रकल्प क्षेत्रातील बेरोजगारांना अजून नोकरी देण्यात आलेल्या नाही . यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,पुनर्वसन क्षेत्रातील बेरोजगार, शेतकऱ्यांच्या ,ज्या समस्या आहेत त्या संबंधात लवकरच संबंधित अधिकारी यांची लवकरच बैठक लावण्यात येईल व त्यावर विचार विनिमय करून योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी प्रकल्पग्रस्तांना सांगितले. या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागातर्फे पटनाट्य सुद्धा सादर करण्यात आले या पटनाट्यातून वैनगंगा नदीला कसं स्वच्छ .ठेवण्यात येईल व मासेमारी लोकांवर सुद्धा अन्याय होणार नाही याकरता सर्वांनी काळजी घ्यावे असे आव्हान त्यांनी पटनाट्यतून केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद वंजारी ,विलास वंजारी ,निखिल वंजारी ,मंगेश बांते ,अमित बावनकर ,पत्रकार समाजसेवक संजीव भांबोरे, तलाठी रवींद्र हटवार ,सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, सुभाष सहारे ,जालिंदर टाले ,शामराव सुखदेवे ,दिलीप मेश्राम, व परिसरातील गावातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
