सहसंपादक : रामभाऊ भोयर
आर्थिक बजेट च्या अनुषंगाने, विविध विभागांत महायुती च्या सरकार वर लोक बोलु लागले आहेत मागील आर्थिक बजेट मध्ये ज्या तरतुदी केल्या त्यात प्रामुख्याने आदिवासी समाजाला जो आवश्यक निधी बजेट मध्ये तरतूद केली होती ती लोक संख्या च्या प्रमाणात २०% कपात केली होती असे आमचे अर्थतज्ज्ञ यांचे निष्कर्ष आहे आम्ही सातत्याने चळवळीत असल्यामुळे आदिवासी समाजाच्या समस्या आमच्या समोर उभ्या राहतात म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समीती चे प्रमुख मा ॲड वामनराव चटप साहेब, माजी आमदार यांच्या शी चर्चा केली हा आर्थिक बजेट कमी देणं, वळता करणं ही काय भानगड आहे जरा समजून सांगितले पाहिजे म्हणून आम्ही चर्चा केली त्यानी सांगितले की,मा मधुसूदन कोवे जी आदिवासी समाजाची भारतात लोकसंख्या प्रमाण ७% आहे आणि महाराष्ट्रात ९.४% आहे मग राज्यात लोकसंख्या च्या प्रमाणात निधी देण्यात येतोय मग २०% कपात निधी सरकार का ? करतोय या प्रश्नाचे उत्तर सत्तेवर असलेल्या लोकप्रतिनिधी मागितले पाहिजे हा आमचा आरोप आहे सरकार ने कोणती योजना राबवायची हे सरकार चे काम आहे परंतु आपली तिजोरी पाहून योजना चा विचार केला पाहिजे नाही तर “‘ तिजोरीत नाही दाना आणि मले ना ना म्हणा”‘ हे योग्य नाही हे सरकार चे दुर्दैव आहे विविध विभागांचा निधी वळता करणं हे सरकार चे दुर्दैव आहे सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना नी अशा समाज विरोधी धोरणाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि सामाजिक आंदोलन छेडले पाहिजे “‘ स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे ही आमची भूमिका आहे म्हणून आम्ही या विषयावर चर्चा घडवून आणली यात उपस्थित प्रामुख्याने मा.ॲड वामनराव चटप साहेब, माजी आमदार,राजुरा मा डॉ रमेश गजबे माजी मंत्री मा प्रकाश पोहरे संपादक दै देशोन्नती( वृत्तसेवा )मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा रंजनाताई मामर्डे अध्यक्ष महिला आघाडी नागपूर मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ मा राजेंद्र जी ठाकूर जिल्हा अध्यक्ष गडचिरोली मा मुकेश मासुरकर युवा आघाडी अध्यक्ष नागपूर मा ॲड सुरेश वानखेडे जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आणि सर्व पुर्व विदर्भातील विदर्भ प्रेमी आदिवासी समाज बांधव आणि विदर्भ राज्य आंदोलन समीती चे पदाधिकारी सदस्य मंडळी उपस्थित होती.
