राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे राळेगाव येथे आगमन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य प्रचार व प्रसार आणि चरण पादुका पदयात्रा ही श्री गुरुदेव सेवा मंडळ वणी येथुन १८ तारखेला निघाली असून ही पदयात्रा २६ तारखेला श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे पोहचणार आहे. वणी येथून निघालेली पदयात्रा दिनांक २० तारखेला राळेगाव शहरातील श्री गुरूकुंज आश्रम मोझरीचे संचालक डॉ ज्ञानेश्वर मुडे यांच्या घरी आगमन झाले या पदयात्रेत महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसुन आला हे विशेष राळेगाव शहरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर राळेगाव गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या यात्रेकरूंची जेवणाची व राहण्याची व्यवस्था डॉ ज्ञानेश्वर मुडे यांनी त्यांच्या माता नगर येथील निवासी केली होती यावेळी राळेगाव तालुका श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थीत होते.