
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंतरगाव येथे विद्यार्थ्यांना शाळेतच विविध दाखले मिळावेत यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रहिवासी, जात, उत्पन्न इत्यादी आवश्यक दाखले एकाच ठिकाणी सहज मिळवता यावेत, यासाठी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांचे संयुक्त प्रयत्न दिसून आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याध्यापक राजेश शर्मा, महसूल ग्राम अधिकारी निलेश देवळे व राजेश्वर कोळी, सहायक शिक्षक धंमानंद तागडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रविण भरणे तसेच शाळेचे लिपिक आशिष काळे उपस्थित होते. या उपक्रमाला अनेक विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, भविष्यातही अशा प्रकारच्या उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्याध्यापक राजेश शर्मा यांनी सांगितले.
