
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथील पर्यावरण स्नेही व विज्ञान शिक्षक श्री व्हि एन लोडे यांच्या घरी यावर्षी बाप्पासमोर पंढरीची वारी हा धार्मिक व पूर्णपणे पर्यावरण स्नेही देखावा साकारला. विशेष म्हणजे मूर्ती अस्सल शाडूच्या मातीची असून सजावट ही प्लास्टिक मुक्त आहे. त्यांची पुतणी साक्षी बबन लोडे हिने ही पंढरीची वारी साकारली आहे. यासाठी फक्त वाया गेलेले कागद व खर्डा वापरला आहे.वरील देखाव्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून कौतुक केले जात आहे. यासाठी संकेत लोडे व नयन लोडे यांचे सहकार्य लाभले.
