संत सेवालाल महाराज की जयच्या घोषणांनी वरूड जहाँगीर नगरी दुमदुमली

                                                 राळेगाव  तालुका प्रतिनिधी  रामभाऊ भोयर 

बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला शासन स्तरावर मान्यता मिळाली असल्याने ही जयंती सर्व शाळा कार्यालयात साजरी होत असून राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे आज सकाळपासून संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने मंदिरात समाज बांधवांनी एकच गर्दी केली होती. सुरवातीला मंदिरात सर्वपरीने तयारी केली त्यानतर सेवालाल महाराजांना भोग नैवद्य देण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या जीवनावर व कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर महाराजाची पालखी सजविण्यात आली. समोर वाद्य,त्यामागे घोडा, मागे पालखी,त्यामागे सेवालाल महाराजाची प्रतिमा अशाप्रकारे महाराजाची मिरवणूक मंदिरातून निघाली.मंदिरातून निघताना मुख्य मार्गावर घरोघरी पालखी पूजन केले गेले.ही पालखी गावाला संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालत असतांना मुख्य रस्त्यावर जागोजागी रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती.अनेक ठिकाणी पालखी पूजन करण्यात आले.मिरवणूक दरम्यान समाजातील आणि ईतर तरूण सुद्धा संत सेवालाल महाराज की जयच्या नाऱ्यांनी गगनात दुमदुमला सोबतच सर्व आनंदात सहभागी झाले होते.ही पालखी पूर्ण प्रदक्षिणा घालून आल्यावर परत मंदिरात दाखल झाली. त्यानंतर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.त्या महाप्रसादाचा समाजबांधवांनी आनंद घेतला. ही सेवालाल महाराजांची जयंती गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने साजरी करण्यात येत असून या जयंती निमित्त समाजाव्यतिरिक्त तालुका स्तरावर माजी मंत्री संजय देशमुख यांच्या शुभेच्छा बॅनर व्यतिरिक्त ईतर कुठल्याही नेत्यांचे शुभेच्छा बॅनर राळेगावात दिसून आले नसल्याने संत सेवालाल महाराज जयंती बद्धल लोकप्रतिनिधीमध्ये उदासीनता दिसून आली असल्याचे महाराष्ट्र राज्य बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.