ढाणकी आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय दर्जा देण्यात यावे मनसे कडून मागणी


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले होते ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शासनाने करायला पाहिजे होते मात्र प्रशासन नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे
ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या पाहून जर ग्रामपंचायतीची नगरपंचायत करता येते मग नागरिकांच्या आरोग्या विषया कडे का लक्ष देत नाही आसा प्रश्न घेऊन मनसे तालुका अध्यक्ष शेख सादिक यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून ढाणकी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी केली
ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या आणी परिसरातील गावातील लोकसंख्या याचा संपूर्ण भार ढाणकी आरोग्य केंद्रावर पडत आहे त्यातही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराच्या सोई सुविधा नसल्याने आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडत रुग्नासोबत आलेल्या नागरिकांची आणी डॉक्टर यांची शाब्दिक चकमक उडून पोलिसांना मध्यस्थी करावी लागते
रात्री अपरात्री शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या अपेक्षेने आरोग्य केंद्रात येतात मात्र आरोग्य केंद्रात कोणतीच सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आरोग्य केंद्रात उपलब्ध डॉक्टर रुग्णाला आल्या पावली परत तालुक्याच्या ठिकाणी पुढील उपचारा करीता रेफर करतात ढाणकी येथील आरोग्य केंद्राची भली मोठी आवाढव्य नुसती इमारत काय रुग्णाला रेफर करण्यासठी बांधून ठेवली का आसा प्रश्न नागरिक लोकप्रतिनिधीला विचारत असतात
आरोग्य केंद्रात मोठ्या आशेने गरोदर महिला येतात मात्र गरोदर महिलेला बाळात पणा करीता कोणतीच सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे बाळांतपणा करीता आलेल्या महिलेला रेफर केल्या जाते कुटुंब नियोजन संधर्भात कोणतीही सुविधा नाही . त्यामुळे कुटुंब नियोजन करायचं म्हणलं तर नागरिकाला तालुका गाठावे लागते.
बंदी भागातील रुग्ण आणी शहरातील रुग्ण यांना ढाणकी आरोग्य केंद्रात सोयीसुविधा नसल्याने रेफर केल्या जाते. तालुक्याच्या ठिकाण गाठे पर्यंत अनेक रुग्णाणी आपला जीव उपचारा अभावी रस्त्यात सोडला त्यामुळे कधी एक वेळ ढाणकी येथे ग्रामीण रुग्णालय होते याकडे नागरिकांचे डोळे लागले शहरातील लोकप्रतिनिधी फक्त राजकारणात गुंतून आश्वासन देत आहेत.
उपचारा अभावी ढाणकी व बन्दीभागातील रुग्णाचं जीव गेला नाही पाहिजे ..म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी ढाणकी येथे आरोग्य केंद्राला भेट दिली होती त्यावेळी सुद्धा मागणी केली होती ढाणकी शहरात ग्रामीण रुग्णालय करण्यात यावे म्हणून मागणी करत आहे . परंतु प्रशासन नागरिकांच्या आरोग्य सारखं प्रश्ना कडे दुर्लक्ष करत आहे . म्हणून मनसे तालुका अध्यक्ष शेख सादिक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ढाणकी शहरात ग्रामीण रुग्णालय करण्यात यावे अन्यथा आरोग्य केंद्रासमोर आंदोलन करण्याचा इशारा मनसे जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार मनसे उपजिल्हा अध्यक्ष डेव्हिड शहाणे अभिजित नानवतकर सचिन येलग्नधेवार हिरासिंग चव्हाण सिद्धार्त घुगरे मुकुंद जोशी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित दिला
.