राळेगाव तालुक्यात बोगस डाॅक्टराच्या सुळसुळाट,परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात वैद्यकीय अधिकारी यावर लक्ष देतील काय जनसामान्यांचा प्रश्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फोफावत होता ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत बोगस डॉक्टर गावोगावी, गल्लोगल्ली, घरोघरी जाऊन वैद्यकीय व्यवसाय करित होते येथील बोगस डाॅक्टराकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही आहे हे मात्र चिंतेची बाब आहे या लोकांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसताना रोग्यांना हाय डोज दिंल्या जाते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण हे बोगस डाॅक्टर रुग्नांना विविध प्रकारचे आमिश दाखवून स्वताच्या दवाखान्यात उपचार करताना दिसतात रुग्नांना स्वताच्या दवाखान्यातील मेडिशीन देने तसेच नित्याची बाब म्हणजे एका सलाईनचे चारशे ते पाचशे रुपये घेतल्या जाते अशी ओरड ऐकाला येत आहे या बोगस डाॅक्टरांनी स्वताचे दवाखाने टाकले आहे आणि तपासणी फि शंभर रुपये ठेवली आहे या सर्व गोष्टी राळेगाव तालुका अधिकारी यांना दिसत नाही आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे आता संध्या सर्दी,ताप,खोकला या रोगाने राळेगाव तालुक्यांत थैमान घातले आहे शासनाने ग्रामीण भागात फिरून कोणतीही वैद्यकीय मान्यता नसलेल्या बोगस डाॅक्टरावर कार्यवाही करून ग्रामीण भागातील जनतेची काळजी घ्यावी व या बोगस डाॅक्टरावर कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करित आहे