नशामुक्त भारत अभियान संस्कृती संवर्धन विद्यालयात संपन्न

राळेगाव , दि. ३० डिसेंबर : (स्थानिक) संस्कृती संवर्धन विद्यालयात ‘ नशामुक्त भारत अभियान’ विशेष उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. *देशातील तरुणाई ही तंबाखू, गुटखा, दारू तसेच ब्राऊन शुगर, ड्रग्ज, नशेचे इंजेक्शन इत्यादींचे सेवन करुन व्यसनाच्या गर्तेत बुडत जात आहे. त्यातून ते त्यांचे स्वत:चे जीवन हळूहळू नष्ट करीत आहेत. नववर्षाच्या स्वागतात, तर याचा उच्छेद सर्वत्र दिसतो. तेव्हा नववर्ष धुंदीत नव्हे, तर शुद्धीत साजरे करा,असा संदेश मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. यावेळी सर्व कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी ‘ व्यसनमुक्तीची शपथ घेतली. नशामुक्त भारत जनजागृती ‘ उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. उपक्रमाचे प्रास्ताविक सीमा देशमुख, संचालन दिनकर उघडे व आभार प्रदर्शन राकेश नक्षिणे या शिक्षकांनी केले. तसेच याच्या यशस्वितेसाठी देवेंद्र मून, सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम, योगेश मिटकर, मुकुंद मानकर, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, प्रकाश अंबादे आदींनी मेहनत घेतली. विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने उपक्रमात सहभागी झाले.