
सहसंपादक : रामभाऊ भोयर
समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून राळेगाव येथे सुरू असलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत आज, शुक्रवार 21 मार्च 2025 रोजी आठवडी बाजारात मोफत कपडे वाटप स्टॉल लावण्यात आला. या उपक्रमाद्वारे 100 लाभार्थ्यांना कपड्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी माणुसकीची भिंत परिवाराचे भूपेंद्र कारीया, युसुफअली सैय्यद, रामकृष्ण कारमोरे, गंगाधरराव घोटेकर, विश्वासराव वाघ, योगेश पारीसे, नंदकिशोर टिपनवार, अक्षयजी चव्हान, मेघश्याम चांदे, भिकमचंद वर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाला पत्रकार मनोहर बोभाटे, ॲड. रोशनीताई कामडी, शंकरराव गायधने, अरुणराव घनमोडे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. ध्वनी व्यवस्था श्री. बंटी ढूमने यांनी तर टेबल व्यवस्था प्रशांत तोतला यांनी पाहिली.दानशूर व्यक्तींनी दिलेल्या कपड्यांचे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम माणुसकीची भिंत परिवार गेल्या 26 महिन्यांपासून करीत आहे. हा उपक्रम समाजाच्या सहकार्याने पुढे सुरू ठेवण्याचा परिवाराचा मानस आहे.