नंदोरी गावातील नाली तुडुंब ,पावसाच्या पाणी साठून

नंदोरी गावातील मेडिकल चौक येथे असलेल्या ग्राम पंचायत नाल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.एकीकडे जिल्ह्यात डेंग्यू पाय पसरत असताना साठलेले पाणी मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांचा धोका वाढवू शकते त्यामुळे या नाल्या मोकळ्या करून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी ग्राम पंचायत नंदोरी कडून कारवाई व्हावी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.