
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 वां स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना राळेगांव शहरात अवैध दारु विक्री ला उधाण आले होते,पण एल.सी.बी.च्या पथकाने धाड टाकली,त्यामुळे दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी सर्व प्रकारच्या दारू विक्री करणाऱ्या आस्थापन बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी यांचे आदेश होते परंतु अवैध
दारू विक्री करणारे राळेगांव शहरातील व्यवसायिक पहिल्या दिवशी आपल्याजवळ साठा बाळगून असण्याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यांनी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याचा सूचना दिलेल्या होत्या, त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलीस स्टेशन राळेगाव हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की शांतीनगर व बारीपुरा राळेगांव येथे राहणाऱ्या पवन अजय तोटे नावाच्या इसमाने त्याच्या मालकीच्या राहते घरात अवैध प्रकारे दारूचा साठा अगोदरच करून ठेवला आहे अशा खात्रीशीर माहितीवरून पथकाने तात्काळ शांतीनगर बारीपुरा राळेगांव येथे जाऊन पवन अजय तोटे 25 वर्षे यांच्या घराची साक्षीदाराच्या समक्ष झडती घेतली असता 21 नग खरड्याचे बॉक्समध्ये एकूण 1008 नग 180 एम एल क्षमतेचे शिशा देशी दारू गोवा संत्रा नावाचे लेबल असलेल्या किमती प्रती 70 रुपये प्रमाणे एकूण ७०५६० रुपयाचा तसेच एक खरड्याचे बॉक्समध्ये 180 एम एल क्षमतेच्या 48 ऑफिसर ब्लू नावाने लेबल असलेल्या प्रति नग 150 रुपये प्रमाणे असून सात हजार दोनशे रुपयाचा असा एकूण किंमत 77 हजार 760 रुपयाचा देशी विदेशी दारूचा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला सदर प्रकरणात पोलीस स्टेशन राळेगांव येथे आरोपी पवन अजय तोटे वय २५ वर्षे राहणार शांतीनगर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीपुर जगताप श्री आदर्श शिंदे,सोनवणे पोलीस निरीक्षक नाग उषा यांच्या माहिती संदर्भात पोलीस निरीक्षक सह पोलीस निरीक्षक अमोल मुडे, पोलीस अमलदार योगेश डगवार भोजराज करपते सुधीर विदुरकर रणजीत मडावी, सतीश फुके यवतमाळ यांनी पार पाडली आहे.
