राळेगाव तालुक्यातील घरकुल धारकांच्या रखडलेल्या बांधकामासाठी शासनातर्फे रेती उपलब्ध करून द्या :- मनसे

(उपविभागीय अधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन)

रेती अभावी घरकुलाचे बांधकाम अडखळल्याने घरकुल बांधकाम अर्धवट झाले आहे त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याने या लाभार्थ्यांना तत्काळ रेती उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे
राळेगाव तालुक्यामध्ये शासनातर्फे गरीब कुटुंब, शेतकऱ्यांसाठी घरकुल योजना मंजूर झाली असून, घरकुलाचा पहिला /दुसरा हप्ता ची रक्कम जवळपास प्रत्येक घरकुलधारकांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. तसेच शासन निर्देशाने लवकरात लवकर घरकुल बांधकाम सुरू करावे असे आदेश सुद्धा काढण्यात आले आहे. घरकुल बांधकामासाठी सर्वात महत्त्वाचा विषय असलेला एक भाग म्हणजे रेती, राळेगाव तालुक्यामध्ये सध्या कुठलाच रेती घाट लिलाव झाला नसल्याने कुठेच रेती मिळून राहिली नाही, तसेच घरकुलधारकांसाठी घरकुल बांधकाम सुरू करणे खूप मोठी डोकं दुःखीच होत आहे त्यामुळे घरकुल धारकांच्या रखडलेल्या बांधकामासाठी शासना मार्फत आपल्या स्तरावर घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली
अन्यथा येत्या ४ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुक्याच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण करेल असा इशारा या वेळी देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, गजानन बुटे, अनील मेश्राम, संजय ठावरी, गजानन चांदेकर सह घरकुल लाभार्थ्यी पुरुष आणि महिला उपस्थित होत्या.