
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या फुलसावंगी येथे आज दिनांक ७ ऑक्टोबर सोमवार रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेमध्ये गावातील सामाजिक,धार्मिक,राजकीय कार्यक्रमांमध्ये नेहमी सक्रिय सहभाग नोंदवनारे योगेश वाजपेयी यांची सर्वानुमते तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे फुलसावंगी मध्ये पहिल्यांदाच तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड अविरोध करण्यात झाली.यावेळी ग्रामसभेला गावातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
