
आज दिनांक 02/10/ 2022 रविवार रोजी महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित के.बी.एच.विद्यालय पवन नगर सिडको नाशिक येथे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचा 70 वा वर्धापन दिन व आंतरराष्ट्रीय अहिंसेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम संस्थेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. संपदा दीदी हिरे सो.मुख्याध्यापक श्री. आप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला मा.मुख्याध्यापक श्री. आप्पा पवार आर बी एच प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता काकळीज
यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. उप मुख्याध्यापिका युगंधरा देशमुख, पर्यवेक्षक उमेश देवरे अशा चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री,शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व संस्था संवर्धक लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
त्यानंतर के.बी.एच.विद्यालय पवन नगर येथील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे माजी विद्यार्थी त्रिजा यादव , रोहन राऊत, अक्षदा कांबळे, मयुरी बच्छाव इत्यादी माजी विद्यार्थ्यांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.व मंचावर उपस्थित इतर माजी विद्यार्थ्यांचा मा. आप्पा पवार व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांचे वाटप करुन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आपले विचार मांडले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थिनी त्रिज्या यादव हिने शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला व या विद्यालयात शिकत असताना शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच जीवनात यश मिळाले, या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षकांना आदर द्यावा असे आवाहन केले.
त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आप्पा पवार यांनी महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसा या मार्गांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. व कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी 2ऑक्टोबर 1952 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था स्थापन केली.आज रोजी संस्थेच्या 95 शाखा कार्यरत असून यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच महात्मा गांधी यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.जय जवान जय किसान हा मंत्र देणारे भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या राजकीय, सामाजिक जीवनाविषयी सखोल माहिती दिली व विद्यार्थ्यांनी या दोन महान विभूतींच्या आपल्या जीवनात आदर्श घ्यावा असे मनोगत व्यक्त केले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी 2 ऑक्टोबर 1952 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना करून अतिशय दुर्गम भागात शिक्षणाची सोय करून दिली असे मनोगत व्यक्त केले. व शेवटीविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींना संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता सोनवणे यांनी केले.या प्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरित सेना प्रमुख जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
