खरेदी विक्री संघ राळेगाव येथे माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्रदिनी राळेगाव येथील रहिवासी तथा देशाची सेवा करून मायदेशी परतलेले माजी सैनिक इंद्रजित लभाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला असून या कार्यक्रमाला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, माजी अध्यक्ष संजय देशमुख, नामदेवराव फटींग,मनोज वर्मा श्रीधर थुटुरकर, प्रशांत बहाळे, प्रविण झोटींग, प्रदीप डाखोरे, अशोक काचोळे,कवडू कांबळे, एकनाथ भोयर,आगलावे महाराज, बाबाराव नगराळे,व संस्थेचे व्यवस्थापक संजय जुमडे, सचिन बोरकर,किरण गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.