
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथे उमेद अभियाना मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती आज दि ३ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रविभाऊ चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे,माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर,सौ विद्याताई लाड,संदीप तेलंगे, दिनेश गोहणे,वसंतराव उपाते हे होते.
ह्यावेळी सरपंच रवी चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थित्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
ह्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महादीप मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.या जयंतीनिमित्त गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.यश ठमके याने रागोळीतून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा साकारली होती, यावेळी महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर गीत गायन सुद्धा केले.ह्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सविता निशिकांत चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक सौ ममता किशोर ठमके यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजना कुरटकर यांनी मानले.या कार्यक्रमाला उपसरपंच किशोर नहाते, मुख्याध्यापक पवार सर, ग्रामसेवक राजेश ढगे ,शेंडे सर,चोपडे सर,श्रुतिका मॅडम मनीषाताई आदे, प्रमिलाताई करमणकर, कोकिळाताई कवाडे पुडके सर,कुमरे सर, वाडगुरे सर हजर होते.
