घामाचे व्हावे मोती खरे शेतात पाजरू दे अमृताचे झरे
येरे येरे पावसा; ढगाची गर्दी पण पावसाचा पत्ताच नाही सर्वच्या नजरा आकाशाकडे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

यंदा हवामान खात्याने दहा दिवस अगोदर पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असताना शेतकऱ्यांनी शेतातील कामे आटोपून खरिपाच्या पेरणीसाठी साठी सज्ज झाला मात्र मृग नक्षत्राला चार दिवस झाले असून सुद्धा अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही त्यामुळे येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे
पावसाळी नक्षत्र म्हणून ओळखले जाणारे मृग पावसाचे पहिले नक्षत्र होय मृग नक्षत्रात कोल्हा वाहन असून कोल्हा सर्वत्र धावणार काय अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असतानाच या नक्षत्राची चाल मंद असून तीन ते चार दिवस झाले असताना सुद्धा मृग नक्षत्र कोरडे दिसून येत आहे खरीप हंगाम तोंडावर असताना पाऊसच नाही त्यामुळे आमच्या घामाचे मोती व्हावे खरे शेतशिवारात पाझरु दे अमृताचे झरे व अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.
खरीप हंगामा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो कारण याच हंगामावर शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक नियोजन अवलंबून असते कोल्हा वाहन असलेल्या मृग नक्षत्रात तसा कोल्हा सर्वत्र धावणार का असा प्रश्न शेतकरी करत आहे मृग नक्षत्राला सुरुवात होऊन तीन ते चार दिवसाचा कालावधी लोटला मात्र तालुक्यात दमदार पाऊस पडलाच नाही आता नियमित व जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र कोल्हा नक्षत्र असलेल्या मृगाची चाल मंद दिसत आहे अभ्यासांती भारतीय हवामान खात्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी आठ दिवसा अगोदर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता त्याप्रमाणे पावसाचे काही संकेत दिसून येत नाहीत परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू क्षेत्र असल्याने बहुतांश शेतकरी नैसर्गिक पावसाच्या भरोशावर आपली शेती कसून उत्पादन घेत असतात सध्या पावसाचे आगमन झाले नसल्याने येरे येरे पावसा तुला देतो पैसा या बालगीतेची आठवण आता ताजी झाली आहे

ढगाची गर्दी पण पावसाचा पत्ताच नाही
हवामान खात्याने गतवर्षीपेक्ष यावर्षी पाऊस समाधान कारक पडणार असून तो आठ दिवसांपूर्वी अगोदर महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत दिले होते त्यामुळे तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी धुरळ पेरणीला सुरवात केली आहे. मात्र तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नसल्याने गत आठवड्यापासून नियमितपणे दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास दररोज आभाळ भरून येते आकाश ढग जमा होतात वादळ वारा येतो आणि ढग निघून जातात बळीराजा आकाशाकडे पाऊस पडण्याच्या अपेक्षेने बघतच राहतो मात्र पाऊस पडतच नाही अशी केविलवाणी प्रतीक्षा जवळपास सात आठ दिवसापासून शेतकरी वर्ग अनुभवतो आहे.