लोकगीतातून लोकशाहीचा जागर राज्य स्तरीय स्पर्धेतून प्रिया माकोडे पुरस्काराने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालया तर्फे घेण्यात आलेल्या लोकगीतातून लोकशाहीच्या जागर २०२२ या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती यात एकल गटातून राळेगाव येथील तहसील कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या प्रिया माकोडे यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना २५ जानेवारी २०२३ रोज बुधवारला मतदार दिनाच्या दिवशी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लोकगीतांचा पारंपारिक गोडवा आणि समाजाला आव्हान करण्याची ताकद या लोकगीतातून असल्याने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालयातर्फे दिं २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत लोकगीतातून लोकशाहीचा जागर राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत राळेगाव तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असलेल्या प्रिया माकोडे यांनी सहभाग घेतला असता त्यांना एकल गटातून द्वितीय पुरस्कार म्हणून रोख पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार असून हा कार्यक्रम मतदार दिनाच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारी २०२३ रोज बुधवारला मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात होणार आहे त्यामुळे प्रिया माकोडे यांनी लोकगीतातून लोकशाहीचा जागर या स्पर्धेतून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याने प्रिया माकोडे यांचे महसूल विभागाच्या वतीने तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 *प्रतिक्रिया*

मला मिळालेला पुरस्कार हा मी संकल्प फाउंडेशन ला देत असून या माझ्या पुरस्काराचा फायदा इतर कामात लागणार असल्याने मला त्यात आनंद आहे म्हणून हा माझा पुरस्कार मी संकल्प फाउंडेशन ला देत आहे


कुं. प्रिया माकोडे