
प्रतिनिधी:दिनेश काटकर,हिंगणघाट
हिंगणघाट दि.२० जुलै
पदवीधर मतदार संघाचे विधानपरिषद सदस्य आ. ॲड अभिजित वंजारी यांचा हिंगणघाट शहर काँग्रेसतर्फे तसेच समता शिक्षक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने शहरात सत्कार करण्यात आला,यात संबोधी नगर शिक्षक संघ,संबोधी नगर बुद्ध विहार पंच कमेटी ,प्रज्ञानगर,आदर्शनगर शिक्षक संघ,येथील शिक्षक संघा तर्फे पुष्प गुच्छ देण्यात आले.समता शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनिलजी तेलतुमडे सर यांनी माल्यार्पण करून मा.आमदार ॲड अभिजित वंजारी यांचा गौरव करण्यात आला व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी असा प्रस्ताव तेलतुंबडे सरांनी वंजारी साहेबांन जवळ मांडला, आणि लगेचच वंजारी साहेबांनी तो मान्य करून विधानसभेत हा प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली. हिंगणघाट शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी ॲड अभिजित वंजारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, ज्वलंत मून अध्यक्ष किसान कॉंग्रेस हिंगणघाट यांनी माल्यार्पण करून वंजारी साहेबांचे स्वागत केले व संबोधी नगर बुद्ध विहार येथे समाज मंदिराची मागणी केली प्रमाणे संत तुकडोजी वार्ड येथील लोक संख्या अंदाजे अकरा हजारावर असुन हा संपूर्ण प्रभाग अविकसित आहे.
या प्रभागामध्ये एकही समाज मंदिर नसुन येथे दुर्बल घटकातील मोलमजुरी करणारे,मिल मजूर व ईतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात राहतात.या प्रभागात समाज मंदिराचे बांधकाम झाल्यास सर्वधमर्मिय लोकांना त्याचा उपयोग घेता येईल.करिता आपल्या माध्यमातून समाज मंदिराचे बांधकाम संत तुकडोजी वार्ड संबोधी नगर बुद्ध विहार येथे झाल्यास समाजातील सर्व लोकांना त्याचा फायदा होईल असे निवेदन किसान कॉंग्रेस हिंगणघाट शहर चे अध्यक्ष ज्वलंत मून यांनी केले व लगेचच मा.आमदार अँड अभिजित वंजारी साहेबांनी होकार दिला व आदर्श नगर,प्रज्ञानगर,संबोधी नगर येथील शिक्षक संघटनेनेसुद्धा आभार मानले.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक काशिनाथजी चारभे सरांनी शब्द सुमनांनी वंजारी साहेबांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.व ज्वलंत मून यांनी वेळोवेळी कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या प्रचारासाठी कशी मेहनत केली हेही या प्रसंगी प्रामुख्याने सांगितले.
मा.आमदार ॲड अभिजित वंजारी यांनी हिंगणघाट शहर तालुका कॉंग्रेसच्या समस्त कार्यकर्त्याचे तसेच शिक्षक संघटनांचे आभार मानले व आपल्या कामांनामी न्याय देण्याचा प्रयत्न करील अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजुभाऊ मंगेकर सरपंच सीरसगाव, विनोद हिवंज तालुका अध्यक्ष समुद्रपुर, अशोक भाले शहर अध्यक्ष हिंगणघाट अनुसूचित विभाग,प्रमोद महाजन तालुका अध्यक्ष हिंगणघाट कॉंग्रेस, मंगलाताई ठक महिला तालुका अध्यक्ष, ईकबाल पहेलवान तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक,आमिन शेख, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते सुनिलजी हरबूडे,छोटूभाऊ रेवतकर, जेष्ठ संघटक हिंगणघाट कॉंग्रेसचे पुरूषोत्तम मुन, गुणवंत कारवटकर,सत्तार साहेब, हिंगणघाट पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोनुभाऊ आर्य, संबोधीनगर बौद्ध पंचकमेटीचे अध्यक्ष भाऊराव भगत,धरमदास थुल , धर्मेंद्र गायकवाड , युवराज गायकवाड,प्रविण मुन लाऊत्रे सर, गंगाधर भगत, अतुल गायकवाड ,विष्णुदास अवथरे ,दिगांबर कुलकर्णी, किशोर थुल , रमेश नाईक, राजकुमार वासेकर, राजकपूर मून, अनिल मुन , वसंतराव थुल, लोहकरे,रींगणे सर, दिलिप पाटील , मोरेश्वर पाटिल ,मनोज खेळकर,राष्ट्रपाल देवगडे ,अमर मोटघरे ,संजय डवले , सचिन शंभरकर,विक्रम तामगाडगे ,निलेश खरे,शरद वासे ,बाळा भाले , महेन्द्र मून ,अनिल बाभळे ,प्रमोद गावंडे,दिलिप पाटील, सुभाष ताकसांडे , प्रमोद पाटील ,शिक्षानंद खैरकार ,राहुल घवघवे इत्यादि शिक्षक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
