ह.भ.प. जुमनाके महाराज यांच्या अध्यक्षतेखाली चिखली येथे गुरु देवाची स्थापना


जगाच्या कल्याणा संताच्या विभूची देह कष्ट भीती परोपकारे, ह भ प जुमनाके महाराज

  

राळेगाव तालुक्यातील चिखली येथील ह भ प पांडुरंग जी जुमनाके महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरुदेवाची स्थापना सन. १२/३/२०१९ ला करण्यात आली आहे. ज्यांनी आपले जीवन जगाच्या कल्याणासाठी झिजविले अशा महान मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रचारक श्री अंबादासजी लालसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प. पांडुरंग जी जुमनाके महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरुदेव महाराज यांच्या नावाने शाखा स्थापन करून शाखा नोंदणीकृत क्रमांक ७५८१ असून येथील शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर या कार्यक्रमामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गोसावी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी चिखली या गावी वेगवेगळे उपक्रम राबवल्या जातात तसेच दैनंदिन हरिपाठ व गुरु देवाची प्रार्थना असे दैनंदिन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या दैनंदिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी धर्मेंद्र जुमनाके तबलावादक, सदाशिव झीले हार्मोनियम वादक, ज्ञानेश्वर तोडासे खंजिरी वादक, सुभाषराव ठावरे गायक तसेच सहयोगी सदस्य हरिभाऊ ठाकरे, मंगेश पडाल, उत्तम दोडके, सदानंद तुराळे, वासुदेव ठावरी , नरेश जुम्नाके व वारकरी सांप्रदाय मंडळी विणेकरी मारुतराव उगे, मृदंग वादक दिनेश ठाकरे, सयोगी सदस्य राजू चंदनखेडे, नरेश कोडापे, हनुमान गाडगे, आशिष कुबडे, पांडुरंग सालवटकर, वामनराव कुबडे यांच्यासह गावातील बालगोपाल यांच्या पुढाकाराने चिखली येथे विविध कार्यक्रम राबविल्या जात आहे.