भावनाताई गवळी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

खासदार भावनाताई गवळी यांची उपस्थिती राहणार!, रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे शिवसेना शहरप्रमुख पिंटू बांगर यांचे आवाहन, जिजाऊ फाउंडेशन तर्फे आयोजित रक्त तपासनी शिबिराचा महिलानी लाभ घ्यावा – विद्याताई खडसे

वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावनाताई गवळी पाटील यांचा २३ मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व रक्त तपासनी शिबिराचे आयोजन संदीप मंगलम यवतमाळ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्ष नेत्या तथा खासदार भावनाताई गवळी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजे दरम्यान उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील शिवसैनिकाकडून दरवर्षी खासदार भावनाताई गवळी पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. त्याप्रमाणे यावर्षी देखील यवतमाळ येथे गुरुवार 23 मे रोजी सकाळी 10 वजता संदीप मंगलम यवतमाळ येथे भव्य रक्तदान व रक्त तपासनी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. खासदार भावनाताई गवळी पाटील यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तपुरवठा मिळावा या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आपल्या आरोग्याची तपासणी मोफत करता यावी यासाठी रक्त रक्त तपासनी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या मधे शुगर बीपी केएफटी लफ्ट लिक्विड प्रोफाइल थायराइड हीमोग्लोबिन तसेच इतर रक्त तपासणी या शिबिरामध्य नि शुल्क केल्या जाइल जिल्ह्यातील गरजू व्यक्ती व रुग्णांनी लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरामध्ये जिल्ह्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख पिंटू बांगर यांनी केले आहे. तसेच जिजाऊ फाउंडेशन तर्फे आयोजित रक्त तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन विद्याताई खडसे यांनी केले आहे.