
सहसंपादक: रामभाऊ भोयर
हैद्राबाद नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ ने करंजी कडून वडकी कडे एका पिवळ्या रंगाच्या ऑटोमधून सुगंधित तंबाखूचा साठा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे वडकी पोलिसाच्या सहकार्याने व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकाऱ्याच्या वतीने दिं २१ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित गुटखा तंबाखू वडकीकडे येत असताना किनी जवादे गावाजवळ ऑटो थांबवून पाहणी केले असता या ऑटोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधी गुटखा तंबाखू आढळून आला असून एक लाख ७८ हजार ४० रुपयांचा गुटखा तसेच ऑटो मोबाईल असा एकूण ४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंजाब दांदे अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाल यांचे फिर्याद वरुन गुन्हा नोंद करण्यात आला. सदची कार्यवाही ठाणेदार विजय महाले, पो.उपनि, प्रशांत जाधव, पोहेकॉ. विलास जाधव, नापोकॉ.सचिन नेवारे, पोकॉ.आकाश कुदुसे, पोहवा.नागरगोजे तसेच घनश्याम पंजाबराव दांदे अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाल याचे समवेत पार पाडली.
