
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ऑटोचा भीषण अपघात झाल्याने या अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक १४ डिसेंबर रोजी चार वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील वडकी येथील सैनिक धाब्यासमोर घडली.
बंडू राठोड रा. चाळीसगाव तालुका हिंगणघाट असे अपघातात ठार झालेल्या ऑटो चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
ऑटो चालक बंडू राठोड हा कारेगाव येथील अंकुश एकोणकर याच्या मालकीच्या ऑटोवर चालक होता. दुपारच्या सुमारास बंडू राठोड हा त्याचे नातेवाईकाकडे साक्षगंधाचा कार्यक्रम असल्याचे कारणाने वडकी येथून किराणा वस्तू ऑटो मध्ये टाकून नॅशनल हायवे क्रमांक 44 ने गारगोटी गावाकडे जायला निघाला मात्र वडकी येथील सैनिक धाब्यासमोरील चालकाचे ऑटो वरील नियंत्रण सुटल्याने
महामार्ग लगत असलेल्या दिशादर्शक फलकाला ऑटोची भीषण धडक झाली.
यामध्ये ऑटो चालक बंडू राठोड याचे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्गाची चमू व वडकी बीट जमादार निलेश चौधरी होमगार्ड प्रवीण चौधरी लगेच घटनास्थळावर दाखल झाले.व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता राळेगाव येथे पाठवण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांचे मार्गदर्शना बीट जमादार निलेश चौधरी हे करीत आहे.
