
.
वरोरा तालुक्यातील बांद्रा (बोरगाव )येथे ब्र. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव १५-१६-१७ जानेवारी रोजी तीन दिवस श्री हनुमान मंदिर देवस्थान बांद्रा येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून करण देवतळे प्रदेश सचिव भा ज पा युवा मोर्चा , कार्यक्रमाचे अध्यक्ष जया चिंचोलकर सरपंच बांद्रा व प्रमुख पाहुणे म्हणून अहतेशाम अली मा. नगराध्यक्ष वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा, ग्यानीवंत गेडाम पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता, कमलाकर मगरे मा.संचालक वि. सह. सो. टेमुर्डा , गुणवंत दडमल उपसरपंच बांद्रा, अविनाश चिंचोलकर पोलीस पाटील बांद्रा, देवराव दडमल , अरुण काळमेंघे, पांडुरंग ढोक, वासुदेव आस्कर, दिगांबर कुबडे, सतीश हक्के अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ बांद्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिकांनी व गुरुदेव प्रेमींनी घेण्याचेआवाहन गुरुदेव सेवा मंडळ व हनुमान मंदिर तथा समस्त ग्रामवासी बांद्रा यांनी केली आहे.
