
वरोरा:– लग्नामध्ये दारु पिऊन गेलेल्या युवकांचा आपल्याच मित्रासोबत भांडण झाले. भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली मुकेश चांदेकर वय 25 वरोरा, मयूर गुरनुले वय 24 वरोरा , रोहित लोणारे 25 वरोरा, राजेश मडावी 32 वरोरा , सुमित शेडमाके वय 22 वरोरा व इतर यांवर भारतीय न्याय संहिता नुसार दाखल करण्यात आला. घटना दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी तीन वाजताच्या सुमारास शगुन लॉन येथे घडली.
आरोपी व फिर्यादी जखमी प्रणय प्रकाशराव पारेलवार वय 25 वरोरा व त्याचा मित्र सागर डाखरे हे दिनांक सात डिसेंबर रोजी शगुन लॉन येथे लग्न समारंभात गेले होते. लग्नकार्य आटोपल्यावर पुढील सप्तपदी वगैरे दरम्यान सकाळी तीन वाजताच्या सुमारास प्रणय प्रकाशराव पारेलवार व त्याचा मित्र सागर डाखरे यांचा आरोपी मुकेश चांदेकर , मयूर गुरनुले, रोहित लोणारे, राजेश मडावी ,सुमित शेडमाके व इतर यांच्यात वादविवाद झाला. आरोपींनी त्या दोघांना लाठीकाठीने डोक्यावर, हातावर मारहाण सुरू केली त्यामध्ये प्रणय गंभीर जखमी झाला तर सागर याचा हात फ्रॅक्चर झाला . जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतू परिस्थिती गंभीर असल्याने त्यास नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 109,296,189,190, 191नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस अधिकारी नायोमी साठम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस हवालदार रामशेट्टीवर, दीपक मोडक करित आहे. आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन (११डिसेबरपर्यंत) दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
