
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अमरावती महानगरपालिकेच्या डेप्युटी कमिशनर तथा यवतमाळ , दिग्रस , महागाव अशा विविध ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी पारदर्शकपणे सांभाळणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका , दबंग अधिकारी अशी त्यांची जनसामान्यात ओळख असलेल्या , आदरणीय माधुरीताई मडावी यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे .
अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांची आज निवड सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई सव्वालाखे यांनी नियुक्त पत्र देऊन केलेली आहे .
यावेळी आमचे नेते यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्ल भाऊ मानकर उपस्थित होते .
माधुरी ताई मडावी यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन व त्यांना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा …..
भावी आमदार माधुरीताई मडावी आरमोरी विधानसभा मतदारसंघ जिल्हा गडचिरोली
