
वर्धा : विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ व वाणिज्य शिक्षक मंडळ, नागपूर यांनी वर्धा आणि नागपूर ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासाठी संयुक्त ऑनलाईन बैठक आयोजित केली. बैठकीत शिक्षक संघटनात्मक बळकटी, रौप्यमहोत्सवी द्वैवार्षिक अधिवेशनाची तयारी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे नियोजन यावर सखोल चर्चा झाली.
मंडळ मागील २५ वर्षांपासून शिक्षक व विद्यार्थीहितासाठी सातत्याने कार्यरत असून, विविध चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानजागृती निर्माण केली आहे. यावर्षी मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून, १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे भव्य अधिवेशन आयोजित केले जात आहे.
बैठकीचे अध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर होते, तर सचिव डॉ. चेतन हिंगणेकर यांनी अधिवेशनाच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन मीटिंग आयोजक डॉ. अभिजीत देशमुख यांनी बैठक यशस्वीपणे पार पाडली.
बैठकीस वर्धा व नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिका , प्रा. अभिजीत डाखोरे, प्रा. डॉ. अनीस बेग, प्रा. अनंता बुर्हाण, प्रा. सतीश गजबांधे, प्रा. दीपक डांभळे, प्रा. खुशबू कटुलवार, प्रा. मयूर गांधी, प्रा. नीलम बर्मसे, प्रा. नितीन कोल्हारकर, प्रा. शीतल देशमुख, प्रा. श्रद्धा चांदक, प्रा. स्नेहा गेडाम, प्रा सुनिल अल्लेवार, प्रा. विष्णू फुळे, प्रा. यशश्री जाधव आणि प्रा. आशा मॅडम तसेच मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी ऑनलाईन मीटिंगला उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी रौप्यमहोत्सवी अधिवेशन अधिक प्रभावी, उपयुक्त आणि विद्यार्थीहितदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
