
प्रतिनिधी//शेख रमजान
आधार कार्ड हे शासकीय यंत्रणेतील व दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला ढाणकी शहर हे नगरपंचायत दर्जाचे असून सुद्धा या ठिकाणी एकच आधार संच आहे. सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात बेहाल होत असताना शहराचा होत असलेला विस्तार व या आजू बाजूचा संबंध ढाणकी शहराशी येतो. बंदी भागातील अनेक गावेसुद्धा बाजारपेठेची निगडित असताना या ठिकाणी केवळ एकच आधार संच चालू असला व तो तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्यास जनतेची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. यावेळी विस्तारित असलेल्या विभागाचा विचार करून या ठिकाणी आधार संच अतिरिक्त स्वरूपात देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र, हे तत्काळ मिळण्यासाठी नियम व अटी शिथिल करून आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असेच नियम शिथिल करून मोठ्या प्रमाणात गरज असताना आधार कार्ड केंद्राची गरज असताना या ठिकाणी आधार संच सुरू होत का नसेल..? अनेक गरोदर माता भगिनींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मध्ये फेर बदल करावा लागतो तरच शासनाचा विविध लाभ मिळतो. नावात बदल करणे, जन्मतारीख, पत्ता बदलणे, अशा विविध बाबीला अनुसरून आधार संच जिथे असेल त्याच ठिकाणी जावे लागते पण ढानकी येथे एकच आधार संच असेल व तो सुद्धा बंद पडल्यास सर्वसामान्यांनी करायचे तरी काय.आधार संदर्भातील अडचण सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असून या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तासंतास रांगेमध्ये उभे राहावे लागते यामध्ये वेळेचा पैशाचा सुद्धा अपव्यय होत आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ एकच आधार संच असून चालणार नाही तर अतिरिक्त स्वरूपात प्रशासनाने संच देऊन ही अडचण दूर करणे महत्त्वाचे ठरते. दिव्यांग वृद्धां बांधवांचे सुधा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. ग्रामीण भागातील जनतेचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर चालतो पण दोन तीन दिवस आधार कार्डचे काम करण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत असल्यामुळे कामात सुद्धा खोळंबा होत आहे.
शासनाच्या विविध नोकर भरतीच्या जाहिराती असताना त्या संदर्भात वर्तमान परिस्थितीत ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात असून अर्ज करायचा असल्यास आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे अत्यावश्यक असतो ओटीपी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होते. विद्यार्थ्यांना मोबाईला आधार लिंक करणे गरजेचे असते पण यासाठी सुद्धा तरुणांना इतर ठिकाणी जाऊन ही प्रक्रिया करावी लागत आहे त्यामुळे तरुणांचा वेळ व पैसा अतिरिक्त स्वरूपात जात आहे. देश प्रगतीकडे जात असताना व आधार कार्डवर जास्तीत जास्त शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असताना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी बाबीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सोमवार हा ढाणकी येथील बाजार दिवस असतो त्यामुळे अनेक आजूबाजूच्या खेड्यातील व्यक्ती हे बाजार व बँक आणि आधारशी निगडित कामे करण्यासाठी येत असतात प्रामुख्याने यामध्ये शेतकरी असतात पण अनेकांना ढानकी शहरात आल्यानंतर आधार कार्ड संदर्भातील काम न करता परत जावे लागत आहे. शेतकऱ्याला शासनामार्फत मिळत असणारी बी बियाणे, महाडीबीटी अंतर्गत मिळणारा यंत्राचा लाभ या विविध योजनेसाठी मोबाईल ला आधार लिंक असणे गरजेचे असताना यात काही अडचणी आल्यास बाहेर ठिकाणी जाऊन या संदर्भातील कामे करावी लागत आहे.
प्राथमिक शाळा ,उच्च माध्यमिक विद्यालय, दोन राष्ट्रीय बँका पतसंस्थेचे विस्तारित असलेले जाळे या सर्व बाबींचा विचार करून शासनाने अतिरिक्त संच देऊन सर्वसामान्यांची अडचण सोडवावी असे जनतेमधून बोलल्या जात आहे.
