
विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने आज दि :- 6 फेब्रुवारी,दु. १ वा पिंपळखुटी, (पांढरकवडा) तेलंगणा सीमेवर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे पिंपळखुटी तेलंगणा सीमेवर विदर्भ राज्यात आपले सहर्ष स्वागत आहे या आशयाचे फलक लावण्यात आले.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
या रास्ता रोको मुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडकली होती
या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोगांडे, पुरुषोत्तम पाटील, शेतकरी नेते विजय निवल, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटींग, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे, मंजुषा तिरपुडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवरावजी धांडे, गोविंदराव चितांवार, पिंपळखुटीचे सरपंच रमेशराव मुडपल्लीवार, गोपाल भोयर, गजानन ठाकरे, किसनराव गाढवे, बबनराव ठाकरे, मधुसूदन कोवे, दिवाकर भोयर, दशरथ पाटील, बालाजी काकडे, नारायणराव गोडे,सिध्दार्थ पाटील, अशोक कपीले भास्कर पाटील,सचिन झोटींग,सह शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सुमारे अर्धातास रस्ता रोको करण्यात आला शेवटी आंदोलकांना पोलिसांनी अटक करुन रस्ता मोकळा करण्यात आला
