
काव्ययोग काव्य संस्था पुणे तसेच राजयुवा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त आयोजित
बक्षीस वितरण,पुस्तक प्रकाशन,तसेच राजयोग कवी संमेलनाचे आयोजन केले होते.
या वेळी उद्घाटक सौ.वसुधा नाईक,कार्यक्रम अध्यक्ष प्रा.शरद चंद्र काकडे देशमुख , कवी संमेलन अध्यक्ष डॉ.शैलेंद्र भणगे,विशेष उपस्थिती सौ.चैताली कापसे प्रमुख पाहुणे मा.विलास बाबर,पाठ्य पुस्तकातील कवी श्रीराम घडे, दिग्दर्शक मा.प्रमोद सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संपादिका कवयित्री अस्मिता तिगोटे यांच्या प्रातिनिधिक “जीव गुंतताना” या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या वेळी राजयुवा प्रकाशनाचे अध्यक्ष मा.गौरव पुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी काव्ययोग काव्य करंडक तसेच राजयुवा काव्य करंडक,काव्ययोग महाराष्ट्राचा लाडका कवी या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
काव्ययोग काव्य संस्थेकडून
आईचे हळवे मन लिखित वसुधा नाईक यांच्या कथा संग्रहाला सर्वोत्कृष्ट कथा संग्रह पुरस्कार २०२५,कवी श्रीराम घडे यांच्या
रूमणं या काव्य संग्रहाला सर्वोत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कार २०२५,युवा समाज भूषण पुरस्कार २०२५ प्रमोद सूर्यवंशी,युवा काव्य गौरव पुरस्कार कवी तुषार पालखे,तसेच उत्कृष्ट निवेदक पुरस्कार कवी श्रीशैल सुतार यांना काव्ययोग संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आलेल्या सर्व कविनी आपल्या वेग वेगळ्या विषयावर रचना सादर करून रसिक वर्गाची मने जिंकली.कार्यक्रम अध्यक्ष प्रा शरदचंद्र काकडे देशमुख यांनी आपल्या विनोदी कवितेतून रसिकांना खळखळून हसवले.
उद्घाटक सौ. वसुधा नाईक यांनी आपली कविता सादर केली,विशेष उपस्थिती इंस्टाग्राम वर प्रसिद्ध असणाऱ्या चैताली राईट म्हणजे सौ.चैताली कापसे यांनी आपल्या गोड आवाजाने
बाप कवितेतून रसिक मनाचे डोळे पाणावले.प्रमुख पाहुणे प्रमोद सूर्यवंशी यांनी आपल्या हिंदी गेय रचनेतून रसिकांना मंत्र मुग्ध केले.पाठ्य पुस्तकातील कवी श्रीराम घडे यांनी आपल्या हास्य कवितेतून रसिकांना हसवले.तसेच कार्यक्रमाच्या सुरवातील बाल कवयित्री मृण्मयी काळे हिने आपली नाट्य छटया यातून परोपकारी आजी या विषयावर सादर केली.
कवी संमेलन अध्यक्ष डॉ.शैलेंद्र भणगे यांनी आपल्या सुंदर भाषणाने तसेच कविता जशी लिहिता तसे आचरण असावे.त्याशिवाय तुमच्या कवितेला अर्थ नाही असे सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी श्रीशैल सुतार यांनी आपल्या शीघ्र चारोळीतून,कवितेतून रसिकांना हसते खेळते वातावरण ठेवले.
या कार्यक्रमाचे आयोजन
काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे, गौरव पुंडे,तुषार पालखे,गौरी राजगुरू,प्रतिमा शिंदे यांनी केले.
