रिधोरा परिसरात चार, चार, दिवस वीज गुल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी वीज कंपनीच्या अजब तमाशा गजब काहनीला रिधोरा परिसरातील जनता झाली त्रस्त ६ ते ७ दिवस झाले आहे वडकी वीज पुरवठा कंपनीने लोडशेडिंग चालू केले आहे. सविस्तर वृत्त असे वडकी वीज पुरवठा कंपनीने ग्रामीण भागासाठी सकाळी २ तासाचे व दुपारी २ तासाचे लोडशेडिंग सुरू केले आहे. वडकी वीज पुरवठा कंपनी अंतर्गत अंदाजे ४० ते ४५ गाव येत असुन वडकी हे गाव वगळता इतर सर्व गावामध्ये लोडशेडिंग सुरू केले आहे यात बुधवार, गुरवार,शुक्रवार,शनिवार सकाळी ७ ते ९ म्हणजे दोन तासाचे लोडशेडिंग सुरू केले आहे. तर रविवार, सोमवार, मंगळवार दुपारी ३ ते ५ म्हणजे दोन तासाचे लोडशेडिंग सुरू केले आहे. मात्र या लोडशेडिंग मधून नेमके वडकी गाव वगळून बाकी सर्व गावामध्ये लोडशेडिंग सुरू केले आहे. हे लोडशेडिंग फक्त ग्रामीण भागासाठी लागु केले असेल तर वडकी हे गाव ग्रामीण भागात येत नाही का ? असा प्रश्न रिधोरा परिसरातील नागरिक करतांना दिसत आहे. या संदर्भात संबंधित अधिकारी यांना वीच्यारना केली असता त्यांनी असे सांगितले की जीथे वीज चोरीचा प्रकार चालू आहे तीथे लोडशेडिंग दिले आहे. सदर वडकी वीज पुरवठा कंपनी अंतर्गत अंदाजे ४० ते ४५ गाव येत आहे मग वडकी सोडली तर बाकी गावामध्ये वीज चोरी होत आहे का ? जर वीज चोरी होत असेल तर वडकी वीज वितरण कंपनी गप्प का ? वीज चोरीला आळा घालने हा पर्याय आहे. का ? पुराव्या अभावी दहा दोशी निर्दोष सुटले तरी चालेल पण एका निर्दोष व्यक्तीला सजा होवू नये असे सांगितले जाते. परंतु वडकी वीज वितरण कंपनीचा अजब तमाशा कजब कारभारामुळे रिधोरा परिसरातील जनता त्रस्त झाली आहे.
प्रतिक्रिया
लोडशेडिंग हा विषय वरुनच ठरलेला आहे. जीथे जास्त लॉस मध्ये कंपनी आहे.जिथल्या गावामध्ये वीज चोरीचे प्रमाण जास्त आहे तिथल्या गावामध्ये लोडशेडिंग सुरू केले आहे.
वडकी वीज वितरण कंपनी साहाय्यक अभियंता गिरी
प्रतिक्रिया
वीज चोरीला जाते म्हणून किंवा कंपनी लॉस मध्ये येते म्हणून लोडशेडिंग करणे हा काही पर्याय नाही. वसुली करणे व वीज चोरी करनाऱ्यावर कठोर कारवाई करणे हा पर्याय आहे. एप्रिल. मे मध्ये तापमान वाढलेले असते वाढत्या तापमानाचा परीणाम लहान मुले व वयवृद्ध मानसा वर होवू शकतो.
उमेश गौऊळकार सरपंच रिधोरा
