
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बहिण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणाऱ्या रक्षाबंधना निमित्त राळेगाव येथील क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला मंडळाच्या वतीने दिं. ९ जुलै २०२५ रोज शनिवारला पोलीस स्टेशन येथे पत्रकार व पोलीस बांधवांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रक्षाबंधन एक पवित्र सांस्कृतिक भावनिक अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण आहे बहिणीने भावा प्रति मंगल कामना करत राखी बांधावी अनुभवाने रक्षणाचे वचन तिला द्यावे अशा गोड भावबंधात गुंफलेला हा सण या सणाच्या निमित्याने समाजाच्या रक्षणार्थ कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना तसेच पत्रकार हा समाजासाठी एक महत्त्वाचा घटक मानले जाते कारण ते लोकांना माहिती देऊन त्यांना जागरूक करतात आणि सत्य जनतेसमोर आणण्याचे काम करतात तसेच त्यांना वेळोवेळी बातमी संकलन करण्याचे काम करावे लागते अशा पत्रकार बांधवांना व पोलीस बांधवांना क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला मंडळाचे अध्यक्षा तसेच प्रांत ट्रस्टी इ. ७१७ संतोषी ताई वर्मा, सामाजिक कार्यकर्त्या भावनाताई खंगण, कु. गौरीताई वर्मा,कोदाने ताई, सुनिताताई उईके या महिलांनी राख्या बांधून कृतज्ञेची भावना व्यक्त केली यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दांदे,जमादार गोपाल वास्टर, गोपनीय रुपेश जाधव, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मेहता, महेश शेंडे,अशोक पिंपरे ,फिरोज लाखांनी, राष्ट्रपाल भोंगाडे, तसेच नगरसेवक बाळू धुमाळ व पोलीस बांधव उपस्थित होते.
