राजकीय गोटात खळबळ माजी आमदार राजू तोडसाम करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

केळापूर – आर्णि विधानसभा मतदारसंघाचे आमदार असूनही मागील निवडणुकीला भाजपा ने तिकीट नाकारल्यामुळे विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा हाती घेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहिलेले माजी आमदार प्रा. राजू तोडसाम हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली मिळाली आहे.
माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून दि. 29 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.