
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ: खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षक समन्वय संघ यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज दि. २९/०७/२०२४ ला मा. शिक्षणाधिकारी, ( माध्यमिक) जिल्हा परिषदे यवतमाळ व जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
अशंतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना १ जानेवारी २०२४ पासून विनाअट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागु करणे. मा. शिक्षणमंत्री महोदय यांचे ९ नोव्हेबर २०२४ रोजीचे याबाबतीत पत्र असुन निर्णय घ्यावा.
१२ जुलै २०२४ रोजी मा. शिक्षणमंत्री यांची टप्पा वाढ अनुदानाबाबत केलेली घोषणा. शिक्षण मंत्री यांनी विद्यानभवनातील घोषणेनुसार १ जुन २०२४ पासुन टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दि ३० जुलै २०२४ पुर्वी शासन निर्णय निर्गमीत करुन तात्काळ शिक्षक व शिक्षकेत्तर यांच्या खात्यावर पगार जमा करावी. यासाठी दिनांक २९/०७/२०२४ रोजी पासुन राज्यातील प्रत्येक जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) कार्यालय जिल्हा परिषद यवतमाळ येथे लक्षाणिक धरणे आंदोलन करण्यात आले. अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना
२०२३-२४ च्या संचमान्यते नुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागु करावी. शासन निर्णय १२,१५,२४ मध्ये नमुद केल्याप्रमाणे त्रुटी पुरतात केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देण्यात यावे. राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानस पात्र करून अनुदान मंजुर करावे. दि ३० जुलै २०२४ पर्यंत टप्पा वाढसह अन्य मागण्यांबाबत शासन आदेश निर्गमित करून आंचार संहिता पुर्वी किमान १ महिन्याचा वाढिव टप्पाचा पगार शिक्षकांच्या खात्यांवर जमा करण्यात यावा, या साठी शिक्षण अधिकारी व जिल्हा अधिकारी यवतमाळ येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष प्रा पुरुषोत्तम येरेकर , विभागिय सचिव प्रा श्रीकांत लाकडे , मुख्याध्यापक मुकेश महाडोळे, प्रा नितीन बाराहाते, प्रा गजानन येन्नरवार, प्रा अमोल घरडे, प्रा प्रमोद ढोले, प्रा दिपक गोमासे, प्रा अमोल शंकरवार, प्रा धनराज हलवले, निलेश बोबडे, संदीप देरेकर, योगेश वेले, दिनेश गायकवाड, भैरव भेडे, गोपाळ राठोड,जेनेकर सर,डेरे सर ,काळे सर,ताकसाडे सर
