ढाणकी शहरात हमीभाव केंद्राची उणीव माल विकण्यासाठी जावे लागते तालुक्याला


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


शेतकऱ्याच्या प्रत्येक बाबीला प्राधान्याने अडचणीला त्रागा लूट झाल्याशिवाय सहजाशी काहीही प्राप्त झालेले दिसत नाही. सोयाबीन पेरताना नैसर्गिक अडचणी तर कापणीला मजूर अडलेला असल्यामुळे चढ्या भावाने कापणीचे दर ठरवतात. त्यात भर म्हणून मळणी यंत्रा मधून सोयाबीन काढत असताना मशीनचे व त्यावर काम करत असलेल्या मजुरांची सरबराई केल्याशिवाय ते काढनिला तयार होत नाही. एवढे करून बाजारपेठेमध्ये विकायला आणल्यानंतर सुद्धा योग्य भाव मिळेल याची शाश्वती नाही. कट्टी काटा व ढाणकी शहरातील धारा हा विचित्र नियम यातच बरेचसे काही जाते शेवटी काही पैशाचा दादला शेतकरी ठरतो ही शोकांतिका आहे देशाची महाराष्ट्राची
उमरखेड तालुका हा विस्ताराने मोठा आहे. बंदी भागातील शेतकऱ्याचा विचार केला असता नाफेड केंद्रावर उमरखेड येथे माल नेऊन विकणे अत्यंत कठीण काम, खराब असणारे रस्ते त्यामुळे होणारी त्रेधातिरपीट यामुळे ढाणकी व परिसरातील शेतकऱ्यांना उमरखेड येथील नाफेड केंद्रावर माल नेऊन विकण्यास फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापेक्षा ढाणकी येथे नाफेड केंद्राने खरेदी सुरू केली असती तर ढाणकी व परिसरातील अनेक मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे होणारे कष्ट आणि विलंब झाला नसता स्थानिक ठिकाणी नाफेड केंद्र सुरू झाले असते तर अधिक सोयीस्कर झाले असते.

उमरखेड नाफेड केंद्रावरील सोयाबीनचे वाहने पाच ते सहा दिवस रिकामी झाली नाही त्यामुळे वाहनाला मुक्कामी राहावे लागले त्याचे सुद्धा अतिरिक्त हजार रुपये भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला. शिवाय घरातील कर्ता पुरुष पाच ते सहा दिवस बाहेरगावी सोयाबीन विकण्यासाठी इतर ठिकाणी असल्यामुळे शेतातील अनेक कामे खोळंबल्या गेली. अनेक शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय, कारखान्याला जाणारा ऊस व घरातील असणारी इतर सर्व कामे करताना अडचणींना सामोरे जाताना यावेळी बघायला मिळालं.

ढाणकी शहरात नाफेड केंद्राचे हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या लोकप्रतिनिधी असलेले आ. किसनराव वानखेडे यांनी सोडून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवायला पाहिजे असं शेतकरी वर्गातून बोलले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींचा करंटेपणा निष्क्रियता आणि कमीपणा प्रकर्षाने यावेळी जाणवते याला अनुसरून राजकारण करणाऱ्या नेत्यांनी केवळ आपल्या राजकारणाचा व अर्थप्राप्तीचा झोपाळा झुलवण्याचे काम केले. तसेच एखादा राजकीय पक्षाचा मोठा नेता आला म्हणजे फोटोसेशनचे काम मात्र चोखपणे पार पाडल्या जाते हे विशेष तेव्हा हा बडा घर पोकळ वासा बडे ज्याव पणा बाजूला सारून खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे गरजेचे. खरीप हंगामातील सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्रावर उमरखेड येथे जावे लागले पण रब्बीतील हरभरा तरी खरेदी ढाणकी येथे सुरू होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत