नगर पंचायत पोंभूर्णा कडून विविध विकास कामांचे भूमिपूजन

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा तालुक्यात लोकनेते नाम. श्री. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या विकास कामांचा झंझावत सुरू असून वैशिष्ट्यपूर्ण विशेष योजना अंतर्गत पोंभूर्णा क्षेत्रातील वेळवा रोड तसेच चिंतामणी कॉलेज जवळ प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे तसेच नागरी दलितेत्तर योजनेमधून प्रभाग क्रमांक 4 मध्ये खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करणे अश्या विविध विकास कामांचे भूमिपूजन दिनांक 16.06.2023 रोजी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सुलभा गुरुदास पीपरे यांचे शुभहस्ते पार पडले..या विकास कामाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे
मुख्याधिकारी श्री आशिष घोडे यांनी यावेळी सांगितले.सदर दोन्ही प्रवेशद्वाराचे बांधकाम तसेच खुल्या जागेच्या सौंदऱ्यिकरनाचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर पोंभूर्ना शहराच्या विकासात आणखी भर पडेल..

नगर पंचायत स्थापनेपासून सलग दोनदा सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या विकासाची घोडदौड कायम सुरू ठेवलेली असून,
येत्या काही वर्षांत शहरात डीजिटल शाळा, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, अग्निशमन कर्मचारी यांचेकरिता क्वार्टर चे बांधकाम, बसस्थानक, दलीत वस्ती,आदिवासी वस्तीतील विविध विकासकामे पूर्ण करण्याचा नगर पंचायतीचा मानस असल्याचे नगराध्यक्षा सौ सुलभा गुरुदास पिपरे यांनी व्यक्त केले…यावेळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे, उपाध्यक्ष तसेच बांधकाम सभापती अजित मंगळगिरीवार, नगरसेवक लक्ष्मण कोडापे, दर्शन गोरंटीवार,शिक्षण सभापती आकाशी गेडाम, महिला बाल कल्याण सभापती रोहिणी ढोले, नंदा कोटरंगे, विरोधी पक्षनेते आशिष कावटवार, रीना उराडे, महेश रणदिवे,गुरुदास पिपरे व सर्व नगरपंचायत कर्मचारीवृंद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती…