उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात भाविक भगत लढल्यास निवडूण येण्याची शक्यता,विधानसभा क्षेत्रात तरुण वर्गाचे भाविक भगत यांच्याकडे कल

माहागाव प्रतीनीधी:- संजय जाधव

मागील पंधरा वर्षापासून उमरखेड महागाव विधानसभा आरक्षित असल्याने आतापर्यंत आरक्षणाचे फायदा घेत तीन आमदार निवडून आले आहेत. पण तिनही आमदारांकडून पाहीजेत तसा काम न झाल्याने तिनही आजी माजी आमदारांवर नाराजी व्यक्त होत असताना दिसत आहे.
मग आता चौथा आमदार कोणाला निवडून द्यायचा असे प्रश्न तरूण वर्गात होते.
पण मागील काही वर्षापासून भाविक भगत यांचे कार्य पहात आता भाविक भगत यांनाच संधी मिळावी अशी चर्चा जनतेतून होत असताना दिसत. आहे.
उमरखेड महागांव विधानसभा क्षेत्रात भाविक भगत यांचे अनेक कार्य चांगले दिसून येते .
भाविक भगत यांनी भाविकभाऊ भगत हेल्प फाँन्डेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णाना मदत करून शेकडो लोंकांचे जिव वाचवले असल्याचे दिसून येत आहे.
उमरखेड व महागांव तालुक्यात बरेच शून्य शिक्षकी शाळा होत्या पण वेळीवेळी पाठपुरावा करत अनेक शाळांवर शिक्षक दिल्याचे काम केले असून बऱ्याच तरुण वर्गाला व्यासनमूक्ती कडे नेऊन अनेकांच्या मनात आपली जागा निर्माण केले आहे.असेही जनतेतून एकण्यास मिळत आहे.
भगत हे नेहमीच वाडीवस्ती तांडयात लग्न संमारंभात मरण धरणात आवर्जून हजेरी लावत असल्याने आता त्यांचे अनेक वाडीवस्ती तांडयात संर्पक असल्याने तोच विधानसभेचे मानकरी होतील अशी चर्चा विधानसभा क्षेत्रात रंगली आहे.
मागील काही वर्षापासूनच भाविक भगत यांची उमरखेड महागांव विधानसभा क्षेत्रात निवडणूक लडवायची इच्छा होती पण योग्य त्या पक्षाची दावेदारी न मिळाल्यांने ते लडलो नसल्याचे प्रतिनिधीशी दुरध्वनीवर बोलताना सांगितले.
भाविक भगत यांना आमदार म्हणून संधी मिळाल्यास नक्कीच उमरखेड महागांव तालूक्यात नविन चित्र पाहवयास मिळेल असे तरूण वर्गातून बोलले जात आहे.